You are currently viewing नागरिकांचे पोलिस अधीक्षकांनी मानले मनःपूर्वक आभार…

नागरिकांचे पोलिस अधीक्षकांनी मानले मनःपूर्वक आभार…

रत्नागिरी-

जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण शासनाच्या निर्णयानुसार आणि पोलिस प्रशासनाच्या सूचनेचे काटेकोर पालन करून अत्यंत शांततेने साजरे केले. त्यामुळे कोरोनाचा वाढणारा प्रार्दुभाव रोखण्यात निश्चितच आपण यशस्वी ठरलो. तसेच ‘जिल्ह्यातील नागरीक कायद्याचे पालन करणारे आहेत’ अशी ओळख आपण कायम ठेवल्याबद्दल जिल्हावासीयांचा मी आभारी आहे, असे ऋणनिर्देश उद्गार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.

अनंत चतुर्दशीनिमित्त काल जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशाचे विसर्जन झाले. या वर्षी पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुका या गुलालाची उधळण, ढोल-ताशाच्या गजरात न निघता शांततेत निघाल्या होत्या. कोरोनासंसर्गाच्या भीतीने शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत नागरिकांनी गणेश विसर्जन केले.
जिल्ह्यात काल सुमारे ३६ हजार ७२० घरगुती तर ४८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मिरवणूक किंवा विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली होती. विसर्जन ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून वारंवार गर्दी करणाऱ्यांना हटकून गर्दी पांगवली जात होती. विसर्जनासाठी मोजक्याच लोकांना समुद्रावर सोडण्यात येत होते, त्यामुळे गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी पोलिस आणि जिल्हाप्रशासनाला चांगले यश आले. जिल्ह्यातील नागरिकांचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी प्रशासनातर्फे मनापासून आभार मानले.
गणेशोत्सव आणि मोहरम सणानिमित्त मार्गदर्शक सूचनांचे कायदेशीररित्या पालन करू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यावर लगाम बसविला, याकरिता जिल्हावासीयांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − five =