You are currently viewing शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे लाभकारी मूल्य मिळावे

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे लाभकारी मूल्य मिळावे

भारतीय किसान संघाच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सावंतवाडी

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे लाभकारी मूल्य मिळावे, अशी मागणी सावंतवाडी तहसीलदार यांना भारतीय किसान संघाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पांडुरंग हळदणकर, सिंधुदुर्ग जिल्हा कोषाध्यक्ष रामकृष्ण पंतवालावलकर, निळकंठ बुगडे, ग्राम समिती मळगाव तसेच तालुका कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

निवेदनात असे म्हटले की, भारतीय शेतकरी संघटनेची अखिल भारतीय कार्यकारिणी आणि ३६ प्रांतांचे अध्यक्ष, महामंत्री आणि संघटनामंत्र्यांनी सखोल विचारमंथन करून तीन कृषी सुधारणा अध्यादेशांमध्ये ५ दुरुस्त्या करण्याबाबत विनंती करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

कायद्यात परिश्रमिक मूल्याचा उल्लेख नाही, सप्टेंबर २०२० मध्ये देशभरात २० हजार ग्रामसभा आयोजित करताना ग्रामसभांनी पारित केलेले प्रस्ताव पंतप्रधान आणि कृषीमंत्री यांना पाठविले होते. मात्र कोणतीच दखल घेतली नसल्याने कोविड नियम लक्षात घेऊन पुन्हा ८ सप्टेंबर २०२१ रोजी एकाच दिवसात देशातील ५१३ जिल्हा केंद्रांवर धरणे प्रदर्शन करण्यात आले. यावेळीही पंतप्रधान व कृषीमंत्री यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. दरम्यान तथाकथित शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली (दिल्ली सीमा) हे तिन्ही कायदे पंतप्रधानांनी मागे घेतले. या घोषणेने देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना धक्का बसला. त्यांच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी गरीब आणि कर्जबाजारी होत चालला आहे. सरकार आपापल्या परीने अनेक प्रकारे मदत करीत असले तरी मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांची स्थिती सुधारत नाही. त्यामुळे आपल्या पिकावरील भाव, खर्च आणि नफा जोडून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =