You are currently viewing पुण्यातून ‘या’ शहरांसाठी सुरू होणार नॉन-स्टॉप विमान सेवा

पुण्यातून ‘या’ शहरांसाठी सुरू होणार नॉन-स्टॉप विमान सेवा

पुणे :

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पुण्यातून देशातील पाच शहरांमध्ये नॉन-स्टॉप विमानसेवा 28 मार्चपासून सुरु होणार आहे. खासगी विमान कंपनी स्पाइसजेट (Spicejet) ही सुविधा सुरु करत आहे. दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या पाच शहरांसाठी पुण्यातून विमानसेवा सुरु होणार आहे.

कंपनीने सांगितले कि, कंपनी किमान 66 नवीन फ्लाईट्स सुरु करणार आहे. याशिवाय काही विशिष्ट मार्गासाठी अधिकच्या फ्लाईट सुरु करण्यात येणार आहेत. येत्या 28 मार्चपासून ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे.शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठीचे हे एक पाऊल असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

लहान शहरांमधून विमान प्रवासाची मागणी वढली आहे. त्यामुळे स्पाईसजेट या कंपनीने वाढत्या मागणीचा विचार करुन UDAN योजनेंतर्गत ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. आता नाशिक, दरभंगा, दुर्गापूर आणि ग्वाल्हेर या मेट्रो शहरांसोबत जोण्यासाठी नव्या फ्लाईट्स सुरु करण्यात येणार आहेत. पुणे शहराला विमानाद्वारे पाच मेट्रो शहरांना जोडणारी स्पाईसजेट ही पहिली कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, स्पाईसजेट कंपनीने नाशिक शहरातून दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरु या शहरांसाठी विमानसेवा सुरु केली होती. आता कोलकाता शहरासाठीही विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 11 =