You are currently viewing अपेक्षा आणि कर्तव्य

अपेक्षा आणि कर्तव्य

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या ज्येष्ठ सदस्या लेखिका कवयित्री यांची नववर्षाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि कर्तव्य विशद करणारी उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त काव्यरचना

देशवासींनो, नववर्षाचं, जल्लोषात स्वागत करावं
येणारं वरीस, वीसशे बावीस, कसं असावं, ऐकावं

रोगराईला,संसर्गाला, विरोध करणारं असावं
नागरिकांच्या प्रयत्नांना, साथ देणारं असावं

बाया-बापड्यांना, पोरीबाळींना, सुरक्षित वाटणारं असावं
त्यांच्या ठायी माय- भगिनी पहायला शिकवणारं असावं

प्रत्येकास, पोट भरण्यास, काम मिळणारं असावं
सुशिक्षित वा अशिक्षित तो, बेकार फिरणारं नसावं

पाऊस-पाणी, आबादानी, वेळेवर होणारं असावं
शेतकरी राजा, तो बळीराजा, समाधानी होणारं असावं

शिक्षणाची, विद्यालयांची कवाडं खुलणारं असावं
नियमित शाळा, बाळगोपाळां, जाता येणारं असावं

महागाईची, दुष्काळाची झळ लागणारं नसावं
शेतकऱ्यांच्या शेतमालाला, रास्त भाव मिळणारं असावं

माणुसकीची, सज्जनतेची अनुभूती देणारं असावं
संधीसाधु, मढ्याच्या टाळूवरचं, लोणी खाणारं नसावं

गतवर्षाच्या अनुभवातून, शिकवण देणारं असावं
घडल्या चुकांची पुनरावृत्ती टाळायला शिकवणारं असावं

माणसाने, माणसाशी, माणसासारखं वागणारं असावं
महत्त्वाचा, असा मोलाचा, संदेश देणारं असावं

सौ. भारती महाजन-रायबागकर
चेन्नई

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =