You are currently viewing आमदार नितेश राणेंना सोशल मीडियावर राज्यभरातून मोठा पाठिंबा

आमदार नितेश राणेंना सोशल मीडियावर राज्यभरातून मोठा पाठिंबा

सूडभावनेने केलेल्या कारवाईमुळे सहानुभूतीची लाट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न शिवसेना सरकारच्या अंगलट आल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणे यांचे समर्थन करणाऱ्या शेकडो पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकंदरीत आमदार नितेश राणे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली आहे.

विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संघटना राजकीय मतभेद बाजूला ठेऊन आमदार नितेश राणेंचे समर्थन करत आहेत. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजी राजे ऑफीस, सतीश काळे यांच्यासहित अनेक नेते, कार्यकर्ते यांच्या पाठिंब्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यांना हजारो लाईक्स आणि कमेंट मधून जनता पाठिंबा देत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा