You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने १३६ वा वर्धापनदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, “नारी शक्तीचा”केला सन्मान..

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने १३६ वा वर्धापनदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, “नारी शक्तीचा”केला सन्मान..

सावंतवाडी

२६/१२/२०२१ रोजी चिपी विमानतळ येथून ओरोस मुख्यालय येथे नामदार श्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय जी सामंत यांच्या वाहनाच्या महिला चालक तृप्ती मुळीक यांचा प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या आदेशानुसार १३६ वा वर्धापनदिन च्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग येथे भेट दिली, महाराष्ट्रातील पहिल्या महिला व्ही आय पी वाहन चालक तृप्ती मुळीक(पोलीस दल, सिंधुदुर्ग) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या

यावेळी कणकवली तालुका उपाध्यक्ष निलेश नारायण मालंडकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा