You are currently viewing डीकेटीईच्या प्रा. प्रियंका पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदान

डीकेटीईच्या प्रा. प्रियंका पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदान

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी येथील डीकेटीई इन्स्टिटयूटमधील एम.बी.ए. विभागाच्या प्रा.सौ.प्रियंका सिध्दार्थ पाटील यांना बेळगांव मधील ‍विश्वेश्‍वरैया टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मधून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. याबद्दल त्यांचा डीकेटीई इन्स्टिट्यूटच्या वतीने सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

इचलकरंजी येथील डीकेटीई इन्स्टिट्यूटमधील एम.बी.ए. विभागात प्रा. सौ. प्रियंका पाटील या अध्यापनासाठी कार्यरत आहेत. त्यांनी बेळगांवमधील विश्‍वेश्‍वरैया टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी.पदवीसाठी प्रबंध सादर केला होता.

फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटमधील ‘इफेक्टीव्हनेस अ‍ॅन्ड इंम्पँक्ट ऑफ सेल्प हेल्प ग्रुप इन महाराष्ट्र स्टेट रुरल लाइव्हलीहूड मिशन ऑन द इकॉनॉमिक सोशल अ‍ॅन्ड पॉलिटिकल एमपॉवरमेंट ऑफ रुरल वुमन फ्रॉम मायनोरीटी कम्युनिटी इन सांगली डिस्ट्रीक्ट’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.या प्रबंधासाठी त्यांना नुकताच पीएच. डी.पदवी प्रदान करण्यात आली. यासाठी त्यांना विश्‍वेश्‍वरैया टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीमधील डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे प्रा.डॉ.एम.एम.मुन्शी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

पीएच.डी. पदवी प्राप्त झालेबद्दल प्रा.सौ. प्रियंका पाटील यांच डिकेटीई इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही केतकर, मानद सचिव प्रा.डॉ.सौ. सपना आवाडे यांनी सत्कार केला. यावेळी डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले आणि विभाग प्रमुख डॉ.आर.यु. कंठे यांच्यासह अनेकांनी देखील त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल प्रा.सौ.प्रियंका पाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + seven =