You are currently viewing NEETची परीक्षा 5 सप्टेंबरला होणार नाही, व्हायरल नोटीस खोटी

NEETची परीक्षा 5 सप्टेंबरला होणार नाही, व्हायरल नोटीस खोटी

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हणजेच NEETची परीक्षा 5 सप्टेंबरला होणार नाहीये. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेलं परिपत्रक खोटं आहे,  याबाबत स्पष्टीकरण राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं दिलं आहे. लवकरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार असल्याचंही राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने सांगितलं आहे.

विद्यार्थी आणि पालकांनी अशा व्हायरल होणाऱ्या बोगस नोटीसांवर विश्वास ठेऊ नये, केवळ अधिकृत वेबसाईटवरुन प्रसारीत केलेल्या माहितीचा आधार घ्यावा असं  आवाहनही NTAकडून करण्यात आलंय.

NEETच्या परीक्षांची कोणतीच फायनल डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यात सतत परिक्षांच्या वेळापत्रकाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत.ज्याचा  परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत परीक्षेच्या तारखेबाबतचं परिपत्रक किंवा ऑफिशियल नोटीस जाहीर  करण्यात आलेली नाहीये.

परिक्षेसंदर्भातील पुढील अपडेट लवकरच अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =