You are currently viewing संघर्ष प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित भव्य रक्तदान शिबिर पावशी येथे संपन्न

संघर्ष प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित भव्य रक्तदान शिबिर पावशी येथे संपन्न

पावशी / कुडाळ :

 

संघर्ष प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित पर्व दुसरे भव्य रक्तदान शिबिर  ग्रामपंचायत पावशी सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन प्रथमेश खोत, मिलिंद खोत, सुरेश खोत, सर्वेश पावस्कर, भाऊ तवटे, प्रकाश पावस्कर, अनिकेत घारे, मयूर मैस्त्री यांनी केले होते.

या रक्तदान शिबिराला 35 जणांनी रक्तदान केले. यावेळी पावशी सरपंच वैशाली पावस्कर, यांच्या सह सम्राट कुडतरकर, मनीष मेस्त्री, सुयोग मेस्त्री, सागर भोगटे, शेखर पोखरे, विनायक खोत, मंदार खोत, डॉ. प्रांजली परब, डॉ. अभिजित इंगे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा