You are currently viewing कणकवली पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांचा पदाचा राजीनामा

कणकवली पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांचा पदाचा राजीनामा

कणकवली :

आज कणकवली प.सं.चे उपसभापती, भजनी बुबा प्रकाश पारकर यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पार्टीने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाल पूर्ण होताच प्रकाश पारकर यांनी आपला राजीनामा सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मंजुरी साठी सुपूर्द केला. प्रकाश पारकर यांनी गेल्या वर्षात उपसभापती म्हणून महत्वपूर्ण असे काम केले आहे. ग्रामीण भागात जाऊन तेथील ग्रामीण जनतेचे प्रश्न जाणून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रकाश पारकर यांनी सातत्याने काम पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा