You are currently viewing नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील कसई – दोडामार्ग, वाभवे – वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीसाठीची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मागासवर्गीय उमेदरावांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण प्रस्ताव निवडणूक निर्णय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे शिफारसपत्र घेऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सिंधुदुर्ग यांच्याकडे तात्काळ सादर करावेत असे आवाहन प्रमोद जाधव, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा