You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना आमदार दीपक केसरकर यांनी दिली भेट.

सावंतवाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना आमदार दीपक केसरकर यांनी दिली भेट.

नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई देण्याचे दिले आश्वासन.

सावंतवाडी

तालुक्यातील बांदा, इन्सुली, विलवडे, माडखोल या भागातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बागायतदार ग्रामस्थांची आज माजी पालक मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तेरेखोल नदीपात्रालगत असलेल्या गावांना बसलेल्या पुराचा फटका लक्षात घेता येथील नुकसानग्रस्तांना शासन स्तरावरून लवकरच लवकर नुकसान भरपाई देण्याबरोबरच या नदी पात्रातील गाळ उपसा करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येईल असे आश्वासन त्यांनी माडखोल वासियांना दिले. यावेळी अनेकांनी आपल्या समस्या तसेच कैफियत केसरकर यांच्यासमोर मांडली.

तेरेखोल नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला गाळ काढण्याची मागणी केली तर याठिकाणी एका उद्योजकांकडून नदीपात्रामध्ये अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पूरस्थिती वारंवार उद्भवत आहे. हा बंधारा हटवण्यात यावा अशी मागणीही केली. या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची आकडेवारी केसरकर यांच्यासमोर मांडली. ५७ घरे व ४० हून जास्त दुकानांना पुराचा फटका बसला आहे, तर विलवडे मध्ये ६८ घरांना पुराचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी केसरकर यांनी माडखोल येथील गोपाळ वर्दम तसेच इतर व्यावसायिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

वर्दम यांनी आम्ही आमच्या व्यवसायाचा विमा उतरला आहे, मात्र विमा कंपन्यांच्या एजंट कडून नुकसानीबाबत टाळाटाळा करण्यात येत आहे,असे सांगितले यावर केसरकर यांनी संबंधित कंपनीच्या लोकांची तात्काळ बैठक बोलावून झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत आपण शासनस्तरावर आवाज उठून लवकरात लवकर ही भरपाई देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कित्येक वर्षांची असलेली तेरेखोल नदीतील गाळ उपसा बाबतची मागणी मार्गी लावण्यात येईल त्यासाठी आपण शासन स्तरावर लक्ष वेधणार आहे पावसाळ्यानंतर याबाबत कार्यवाही हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ज्या दुकान व्यावसायिकांना शेती बागायतदारांना संबंधित विमा कंपन्यांकडून विमा देण्यासंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी सरपंच संजय शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्य सुनयना कासकर, माजी सरपंच सूर्यकांत राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कोरगावकर सुरेश शिरसाट राजेश शिरसाट, शिवाजी परब, उपसरपंच विजय राऊळ, संतोष राऊळ, उदय राऊळ, लक्ष्मण कोळंबेकर, गणपत कोरगावकर, शिवसेना शाखाप्रमुख विजय राऊत, बाबा धडाम, श्याम कासकर, दीपक सुकी आदी ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 3 =