You are currently viewing वेंगुर्ल्यात १४ तारखेला मोफत सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन…

वेंगुर्ल्यात १४ तारखेला मोफत सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन…

वेंगुर्ल्यात १४ तारखेला मोफत सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन…

वेंगुर्ले

येथील रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या माध्यमातून १४ एप्रिलला मोफत सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. राजेश्वर उबाळे यांच्या संजिवनी हॉस्पिटल मध्ये हे शिबिर होणार आहे. या शिबिरात वैद्यकीय तपासणी आणि रूग्णालय फी पूर्णतः मोफत आहे.

या शिबिरासाठी मुंबई येथून उच्च शिक्षण घेऊन आलेले डॉ. अनिकेत वजराटकर व डॉ. मोनालिसा वजराटकर हे उपस्थित राहून पोटाचे आजार, हर्निया, मूळव्याध, पित्ताशयातील खडे, स्तनांचे आजार, व्हेरीकोज व्हेनचा आजार, बद्धकोष्ठता, शुगरमुळे झालेल्या जखमा, लघविचे विकार, अंडाशयाचे आजार आदींबाबत तपासणी करणार आहेत.

या शिबिरातील रूग्णांना ऑपरेशनसाठी ५० टक्के सूट, मूळव्याध व फिशरवर लेझरद्वारे ऑपरेशन, तसेच आवश्यक तिथे मुळव्याध व फिशरवर ऑपरेशन शिवाय नवीन बिनटाक्याचे उपचार, पित्ताशयातील खडे व अपेंडिक्सवर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, आवश्यकता असल्यास सोनोग्राफी केली गेल्यास त्यावर ५० टक्के सूट असणार आहे.

या शिबिरासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिरात मर्यादित रूग्ण तपासले जाणार असल्याने प्रथम नोंदणी करणार्‍यांना संधी मिळणार असून गरजू रुग्णांनी ९४२३८९३९३९ व ७२७६६०८२८१ या मोबाइल क्रमांकावर संफ साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट राजू वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, इव्हेंट चेअरमन डॉ. राजेश्वर उबाळे तसेच रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा