You are currently viewing ऑनलाइन लव्हलाईन

ऑनलाइन लव्हलाईन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना*

प्रोफाइल फोटोत केलं Tag
झालो सौन्दर्यावर Attract
स्वीट comments केल्या
केलं तिच्या bf ला Subtract..

चॅटिंग सुरू केली मेसेंजरवर
तिला प्रेमात ओढले एकदम
हार्टबिट्सचा हार्टबिट्सशी
जुळला मस्तपैकी Rhythm..

ऑनलाइन नेहमी बोलतो
हाईड केला आता लास्ट सीन
हजारो मुले तिच्यामागे लागली
तरी माझाच झाला बघा Win..

शब्दांच्या जगात माझ्या
लव्हने गाठला अप्पर स्टेज
तिच्या इमोशनल लाईफचे
माझ्या कवितांशी झाले मॅरेज..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + eight =