You are currently viewing आचरा येथे अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा येथे अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि आचरा व्यापारी संघटना यांच्यावतीने आचरा येथे गुरुवारी सर्व व्यापाऱ्यांच्या सोईसाठी अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. याला आचरा भागातील व्यापारी वर्गाने उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नवीन परवाना संदर्भात संबंधित व्यापारी वर्गाचे अर्ज भरून घेण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाला अन्न सुरक्षा परवाना नव्याने काढता यावा किंवा त्याचे नुतनीकरण सुलभपणे करता यावे यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने संपूर्ण जिल्हाभर विविध बाजारपेठांच्या ठिकाणी अन्न सुरक्षा परवाना शिबिरांचे आयोजन केले आहे याच अनुषंगाने आचरा येथे गुरवारी २३ डिसेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव नितीन वाळके, अरविंद नेवाळकर, स्वराली मोरजकर यांचा आचरा व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक आणि जेष्ठ व्यापारी श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, खजिनदार जयप्रकाश परुळेकर,पंकज आचरेकर, सुभाष नलावडे, देवेंद्र नलावडे, वामन आचरेकर, उज्वल कोदे,सौ करंजे यांसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.

यावेळी आचरा भागातील अजूनही काही व्यापारी बांधवांचे वेळेअभावी परवाना नुतनीकरण किंवा नवीन परवाना काढण्याचे राहिल्याची बाब अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांनी जिल्हा महासंघाचे वाळके, नेवाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पुढील महिन्यात पुन्हा शिबिराचे आयोजन करण्याचे ठरले यासाठी ज्या व्यापाऱ्यांचे अन्नसुरक्षा परवाना नुतनीकरण, नवीन परवाना काढायचे आहे त्यांनी आचरा व्यापारी संघटनेचे जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =