You are currently viewing कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये निधीची कमतरता भासणार नाही

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये निधीची कमतरता भासणार नाही

*युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक*

कणकवली :

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांतील ओसरगाव कळसुली पुनर्वसन महापूरुष रस्त्यालगत धोकादायक वळणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री प्रफुल्ल सुद्रीक यांच्या स्वनिधीतून ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले,त्याकामाचे भुमी पूजन आज कळसुली सरपंच सौ, साक्षी परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगांवकर, जिल्हा युवक जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रशेखर चव्हाण, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर चव्हाण, पुनर्वसन कमिटी उपाध्यक्ष बळीजीजी राणे, माजी सदस्य संतोष मुरकर,बाबू लाड, बाबाजी मुरकर,प्रकाश सातोसे,हरी काणेकर, वैभव मुरकर, वैभव चव्हाण,बाबू घोगळे, साखर शिर्के,यश शिर्के,सत्यवान परब, घाडीगांवकर,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच सौ,साक्षी परब यांनी सांगितले की बराच कालावधी पासून हे काम प्रलंबित होते तसेच धोकादायकही होते,हे काम लवकरात लवकर व दर्जेदार करावे,असे सांगून यापुढेही जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून प्रफुल्ल सुद्रीक यांनी कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या तसेच अर्थमंत्री मा,अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणून एक आदर्श मतदारसंघ बनवावा,असे सांगितले, यावर युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले की जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समिती व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे लक्ष वेधून जास्तीत जास्त विकास निधी या भागात आणून कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्ह्यात आदर्श मतदारसंघ बनविण्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची साथ आवश्यक आहे,ती मिळेल,यात शंका नाही,२१/२२ च्या नियोजन आराखड्यात या भागातील अजून काही विकास कामे मंजूर असून त्यांचें लवकरच उद्घाटन कार्यक्रम करण्यात येतील, असे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + nine =