You are currently viewing वेंगुर्ला शाळा नं.२ मधील रिक्त शिक्षक पद तात्काळ न भरल्यास उपोषणाचा इशारा

वेंगुर्ला शाळा नं.२ मधील रिक्त शिक्षक पद तात्काळ न भरल्यास उपोषणाचा इशारा

वेंगुर्ले

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं २ या प्रशालेत गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ निवेदने देऊनही
शिक्षक पद न भरल्याने अखेर व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पिळणकर यांनी पालकांच्या वतीने तात्काळ रिक्त शिक्षक पद न भरल्यास पंचायत समिती वेंगुर्ला कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.यावेळी उपाध्यक्ष अश्वेता माडकर,उपाध्यक्ष महेश गावकर, कैवल्य पवार,योगेश तांडेल,अभिजित माडकर आदी पदाधिकारी,पालक उपस्थित होते.
या प्रशालेत एकूण विद्यार्थी पटसंख्या १०३ असून त्यासाठी पाच शिक्षक पदे मंजूर आहेत.परंतु त्यापैकी एक शिक्षक पद गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ रिक्त असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
यासाठी गेल्या दोन वर्षात संबंधित प्रशासनाला बऱ्याच वेळा विनंती वजा अर्ज करूनही शिक्षक रिक्त पद भरण्यास संबंधित शिक्षण विभागाने अनुत्साह दाखवला.त्यामुळे अखेर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पिळणकर,उपाध्यक्ष अश्वेता माडकर,महेश गावकर,कैवल्य पवार,योगेश तांडेल यांनी गटशिक्षणाधिकारी गोसावी यांची घेऊन रिक्त शिक्षक पदाबाबत चर्चा करून १५ दिवसांच्या आत रिक्त शिक्षक पद न भरल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा