You are currently viewing रेडी येथील गरजू व्यक्तींना विशाल परब यांच्यातर्फे ३० हजार रुपयांची आर्थिक मदत

रेडी येथील गरजू व्यक्तींना विशाल परब यांच्यातर्फे ३० हजार रुपयांची आर्थिक मदत

वेंगुर्ले :

 

रेडी येथील विविध गरजू व्यक्तींना भाजपायुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

वेदिका विनायक शेटकर यांना घरदुरुस्तीसाठी १० हजार, मानसी सगुण सातोस्कर यांना घरदुरूस्तीसाठी १५ हजार, आर्या संजय राऊत हिला पदवीधर शिक्षणासाठी ५ हजार अशी एकूण ३० हजार रुपयांची आर्थिक मदत विशाल परब यांनी केली आहे. रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते ही मदत वितरित करण्यात आली.

यावेळी उपसरपंच नमिता नागोळकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद भिसे, श्रीकांत राऊळ, सागर रेडकर, ग्रामस्थ उल्हास नरसुले, अमरेंद्र राणे कर्मचारी सगुण सातोसकर आदी उपस्थित होते. या मदतीसाठी विशाल परब यांचे रेडी ग्रामपंचायत कडून आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − eight =