You are currently viewing झाराप येथे मुंबई- गोवा महामार्गावर झाला अपघात

झाराप येथे मुंबई- गोवा महामार्गावर झाला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप जांभळ बस थांब्या नजिक भावई मंदिर फाटा येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक व टेम्पो मधील अन्य एक असे दोनजण जखमी झाले. या दोघांना सावंतवाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार यातील टेम्पो चालक हा सावंतवाडीच्या दिशेने जात असताना झाराप जांभळं बस थांब्याच्या अलिकडे भावई मंदिर कडे जाण्यासाठी वळला.

यावेळी मार्गाहून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरची जोरदार धडक या टेम्पोला बसली.

यात टेम्पो पलटी झाला. या अपघातात पांडुरंग वासुदेव देसाई व दिनकर मारूती झिरमिरे हे दोघेही जखमी झालेत. या दोघांनाही सावंतवाडी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. डंपर चालक हा गोव्याच्या दिशेने जात होता. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील व पोलिस दाखल झाले असून पंचनामा व दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी तेथील स्थानिकानी पलटी झालेला टेम्पो रस्त्याच्या कडेला आणून ठेवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा