You are currently viewing सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानकडून कलंबिस्त वाचनालय व इंग्लिश स्कूलला पुस्तके भेट…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानकडून कलंबिस्त वाचनालय व इंग्लिश स्कूलला पुस्तके भेट…

सावंतवाडी

येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या “शब्दगंध” या वाचन चळवळ उपक्रमांतर्गत कलंबिस्त येथील ज्ञानमंदिर वाचनालय आणि कलंबिस्त इंग्लिश स्कुलला मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेतील पुस्तके भेट देण्यात आली.
सिंधुमित्र प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत सिंधुमित्र प्रतिष्ठानचा शब्दगंध हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेली पाच वर्षे सुरू आहे. जिल्ह्यातील १८ प्रशालेत सध्या हा उपक्रम सुरू आहे. सध्या टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या या समाजमाध्यमांचा दिवसेंदिवस अतिरेकी वापर सर्वत्र पहावयास मिेळतो. त्यामुळे युवा पिढीचे वाचनाकडे दुर्लक्ष झालेले आहे. यातून मार्ग काढून युवाईला योग्य दिशेने न्यायचे असल्यास वाचन संस्कृतीशिवाय पर्याय नाही.
त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये आणि युवा पिढीमध्ये वाचन चळवळ रुजविण्यासाठी सिंधुमित्र प्रतिष्ठानने “शब्दगंध” हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला.
सर्वांच्या घरात वाचनीय परंतु सुस्थितीत असणारी अनेक पुस्तके असतात. अशी पुस्तके वाचून झाल्यानंतर अनेक जण सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या कार्यालयात ही पुस्तकें आणून देतात. त्यानंतर सिंधुमित्र
अश्या एकत्रित झालेल्या पुस्तकांचे वर्गीकरण करून ती पुस्तके ठेवतात. ही पुस्तके कलंबिस्त हायस्कूलसाठी मुख्याध्यापक अभिजित जाधव यांच्याकडे तर वाचनालयासाठी अध्यक्ष रुपा सावंत यांच्याकडे ही पुस्तके सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे व सदस्या डॉ सौ मुग्धा ठाकरे यांनी वितरीत केली.
यावेळी कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजित जाधव आणि वाचनालयाचे अध्यक्ष रुपा सावंत यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 8 =