You are currently viewing बांदा निमजगा येथील स्मशानभूमीची लोक सहभागातून साफसफाई…

बांदा निमजगा येथील स्मशानभूमीची लोक सहभागातून साफसफाई…

तरुणांचा पुढाकार; जेष्ठ नागरीक हनुमंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली राबविली मोहीम…

बांदा

शहरातील निमजगा गवळीटेंब शेटकरवाडी येथील स्मशानभूमीची लोकसहभागातून दुरूस्ती आणि स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरासह वाड्यात पडलेले खड्डे सुध्दा यावेळी बुजविण्यात आले. तेथील जेष्ठ नागरिक हनुमंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यात गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित आपला हातभार लावला.

स्मशानभूमीत वाढलेल्या झाडीची साफसफाई करण्यात आली तसेच शेडची देखील दुरुस्ती करण्यात आली. उन्हाळी दिवसांकरिता नवीन दहन जागा व शेडची डागडुजी तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील दुरुस्ती करण्यात आली.

लोकांमध्ये जागृती व्हावी याकरिता तेथेच तिन्ही वाड्यांचे स्नेहभोजनही करण्यात आले. त्यानंतर वाड्यांमधील रस्त्यांना पडलेले खड्डे देखील या तरुणांकडून बुजवण्यात आले. या कार्यात ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर यांच्यासह गोविंद वराडकर, उमेश तोरस्कर, अशोक नाईक, रामा पेडणेकर, अशोक मंजिलकर, संजय नाईक, पप्या वझरकर, रामदास सावंत, विराज देसाई, गुरु कल्याणकर, पंकज देसाई, सिद्धेश केसरकर, महादेव आईर, मोहन सावंत, सुशांत वराडकर, रवींद्र सावंत, कैलास सावंत, टमा वडार, सुनील धोत्रे, ओंकार सावंत व सतीश शेटकर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा