You are currently viewing दुसरे महायुध्दातील सैनिक, विधवा यांनी हयातीचे दाखले जमा करण्याचे आहवान  

दुसरे महायुध्दातील सैनिक, विधवा यांनी हयातीचे दाखले जमा करण्याचे आहवान  

सिंधुदुर्गनगरी 

 दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्य जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा त्यांनी हयातीचे दाखले 10 जानेवारी 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे जमा करावित, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले अहे.

                जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले हयात असलेचे व दाखल्यावरीती आपला एक फोटा लावून दाखले ग्रामसेवक नगरसेवक अथवा बँकेकडून स्वाक्षरी घेवून सोबत या कार्यालयाने दिलेल्या ओळखपत्राचे प्रत, आधारकार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे जमा करावी . ज्या लाभार्थी दुर्गम भागात राहतात अशा लाभार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांची मदत घ्यावी. तसेच जे लाभार्थी मयत झालेले आहेत त्यांचे मृत्यूचे दाखले त्यांच्या वारसदारानी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावे जेणे करुन त्यांचे पुढील अनुदान कायमस्वरुपी बंद करण्यात येईल.

                लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले 10 जानेवारी पर्यंत जमा न केल्यास अशा लाभार्थीचे अनुदान बंद करण्यात येईल. हयातीचे दाखले वेळेत सादर न केलेमुळे आपले अनुदान बंद झाल्यास स्वत: जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =