You are currently viewing कलमठ गोसावीवाडी – बिडयेवाडी रस्ते कामाचा सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

कलमठ गोसावीवाडी – बिडयेवाडी रस्ते कामाचा सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली :

 

कणकवली येथील कलमठ गोसावीवाडी – बिडयेवाडी रस्त्याच्या रुंदीकरण व नूतनीकरण कामाचा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून ४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कलमठ बिडयेवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लोकवस्तीमुळे हा रस्ता रुंद व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून ४० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होत असल्याने बिडयेवाडी व गोसावीवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कामासाठी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या पाठपुरव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कामाला निधी उपलब्ध करून दिला. यावेळी माजी सरपंच महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदस्य पपू यादव, सदस्या प्रीती मेस्त्री, नितीन पवार, गणेश पुजारे, ऋत्विज राणे, निनाद नाडकर्णी, संजय गुरव, महेश नाडकर्णी, सुरेश पवार, शैलेजा मुखरें, संदीप म्हाडगुत, श्रावणी मेस्त्री, आबा कोरगावकर, समीर रजपूत, उदय पाटील, बसप्पा पुजारी, समर्थ कोरगावकर, केदार पाटील, प्रतिक माईणकर, जयप्रकाश मालंडकर, हिर्लेकर गुरुजी, परेश कांबळी, दिगंबर सावंत, भूषण सावंत, श्रेयस हिर्लेकर, अशोक कांबळी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा