You are currently viewing शिक्षक भारतीचा नारीशक्ती पुरस्कार प्रा.संजीवनी पाटील यांना प्रदान

शिक्षक भारतीचा नारीशक्ती पुरस्कार प्रा.संजीवनी पाटील यांना प्रदान

वैभववाडी

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मराठी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ.संजीवनी सुरेश पाटील यांना शिक्षक भारतीचा नारीशक्ती पुरस्कार- २०२२/२३ देऊन गौरविण्यात आले.
मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी वैभवी सखी मंचच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सुवर्णा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा.संजीवनी पाटील या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात १९९४ पासून मराठी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच
सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदान व प्रभावी सुत्रसंचालन अशा विविधांगी कार्याची दखल घेऊन
शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन काम करणारी शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेच्यावतीने दि.३ जानेवारी,२०२३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी प्रा.सौ. संजीवनी पाटील यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन वैभवी सखी मंचच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा रावराणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण भारती वैभववाडी अध्यक्ष श्री.अविनाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.डी.एस.पाटील, सचिव श्री.स्वप्निल पाटील, नानिवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शिरीष शेंबवणेकर व वैभवी सखी म्हणजे अध्यक्ष सौ.सुवर्णा रावराणे उपस्थित होते.


या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक श्री.एस
पी.परब, तिथवली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.मेस्त्री सर, श्र. जाधव सर, श्री करूळ सर, श्री. माळवी सर,श्री.गणेश टकले सर, श्री.संजय तुळसकर सर, प्रा.श्री.एस.एन.पाटील व सखी मंचच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अविनाश कांबळे यांनी केले‌ तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस.पाटील यांनी केले. शेवटी स्वप्नील पाटील यांनी सर्वांचे आभार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + twenty =