You are currently viewing अर्ज भरलेल्या सर्वच गिरणी कामगारांना घर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – सचिन अहिर

अर्ज भरलेल्या सर्वच गिरणी कामगारांना घर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – सचिन अहिर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सरकार कुणाचेही असले तरी अर्ज भरलेल्या प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी‌ ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात बोलताना दिली.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संस्थेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व. गं. द. आंबेकर यांची ११६ वी जयंती महात्मा गांधी सभागृहात पार पडली. त्यावेळी गिरणी कामगारांच्या मुलांचा शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सहाय्य देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यावेळी सचिन अहिर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. समारंभाला ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार ज्ञानेश महाराव, संघाच्या गं. द. आंबेकर होमिओपॅथी दवाखान्याच्या डॉक्टर रुपाली जाधव, महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी‌ सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांचे स्मारण करण्यात आले.

आमदार सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, आम्ही पाच कामगार संघटना आपआपले झेंडे बाजूला ठेऊन कृती संघटनेच्या‌ बॅनरखाली एकत्र आलो, म्हणून आज विस्थापित होऊ पहाणार्‍या गिरणी कामगारांना मुंबईत घराचा हक्क प्राप्त करून देण्यात यशस्वी ठरलो आहोत. आंबेकरजींनी गिरणी कामगारांच्या आर्थिक मागण्या मिळवून देताना त्यांना मालकी हक्काची घरे मिळवून दिली, त्यांनी दिलेला विधायक विचार आजच्या कामगार चळवळीला मार्गदर्शक ठरला आहे.

सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, आंबेकरजींनी कामगारांना मागण्या मिळवून देताना त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले. तोच विचार आत्मसात करण्याची गरज आहे.

ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव म्हणाले, पायाने चालतात ते अंतर गाठतात आणि डोक्याने‌ चालतात ते ध्येय गाठतात. स्व. गं. द. आंबेकर यांनी कामगार चळवळीत दूरदृष्टी ठेऊन वाटचाल केली म्हणूनच आज त्यांचा वारसा टिकून आहे. डॉ. रुपाली जाधव यांनी कामगारांच्या मुलांना नैराश्य झटकून ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, सूनिल बोरकर, जी.बी.गावडे, सुनिल अहिर, राजन भाई लाड, संजय कदम, सेक्रेटरी शिवाजी काळे, साई निकम आदी मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नेमकेपणाने सूत्रसंचालन केले.

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा