You are currently viewing मनसेच्या वतीने गुळदुवे सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसेच्या वतीने गुळदुवे सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी:-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तेजस्वीनी हेल्थ केअर यांच्या संयु्नत विद्यमाने तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून रविवारी सदानंद महाराज मठ गुळदुवे सावंतवाडी येथे संगणकीय ऑटोमॅटीक जर्मन स्कॉनिंग पध्दतीचे आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबीरात 80 हुन अधिक जणांनी सहभाग घेतला.
मनसे आयोजित तसेच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतूंन गुळदुवे सदानंद महाराज मठ येथे रविवारी संपूर्ण शारीरिक तपासणी अक्युप्रेशर व फिजिओथेरपी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरात हार्ट टेस्ट, ईसीजी टेस्ट, मेंदू कार्यक्षमता, लिव्हर कार्यक्षमता, पित्ताशय, स्वादुपिंड, मुत्रपिंड, फुफ्फुस, मेंदुचे विकार, हाडांचे विकार, लठ्ठपणा, बेसीक तपासणी, स्त्रीयांचे आजार अशा विविध प्रकारच्या ५० ते ६० आरोग्य तपासण्या संगणकीय जर्मन स्कॉनिंग पध्दतीने करण्यात आल्या. या शिबिरात 80 हून अधिक ग्रामस्थानी सहभागी होत लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर महाराष्ट्रसैनिक संदेश शेट्ये दिप्तेश गोडकर ओमकार कोल्हे संतोष पालकर मनोज केदार कमलेश आडकर जयसिंग आडकर मेघश्याम धरणे यांनी मेहनत घेतली. ह्या आरोग्य शिबिरास सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार अभय देसाई लक्ष्मीकांत हरमलकर गोविंद मोरये यांसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सदर कॅम्प राबविल्याबद्दल गुळदुवे तिरोडा नाणोस वासियांनी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर, मनलाॅसे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर महाराष्ट्रसैनिक संदेश शेट्ये व मनसेच्या पदाधिकाऱ्याचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा