You are currently viewing मळगाव आणि इन्सुली दोन गावांच्या मध्ये असणाऱ्या एका गावात गावठी बॉम्ब बनविण्याचा मिनी कारखाना

मळगाव आणि इन्सुली दोन गावांच्या मध्ये असणाऱ्या एका गावात गावठी बॉम्ब बनविण्याचा मिनी कारखाना

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव लाठी आणि इन्सुली गावाच्या मध्येच वसलेल्या निसर्गरम्य छोट्याशा गावात गावठी बॉम्ब बनविण्याचा मिनी कारखाना उभा राहिला आहे. निपाणी येथून आणलेली लाल व पांढऱ्या रंगाची विशिष्ठ पावडर पासून बॉम्ब बनविले जातात.
या गावात उभ्या राहिलेल्या कारखान्यात बनविलेले बॉम्ब रानडुकरांची शिकार करण्यासाठी २५०/- रुपये किमतीने विकले जातात. डुकराची शिकार करण्यासाठी रानात ठेवले जाणारे हे बॉम्ब सकाळी न उचलल्यास शेतकऱ्यांच्या गुरांनी ते खाल्ले तर त्यातून गुरे दगवण्याचा अथवा माणसांनाही अपघात होण्याची भीती उत्पन्न होत आहे.
मिंगेल फर्नांडिस याच्या कडून मळगाव जवळील गावातील दत्तभक्त नाव असणारा गावकर हा स्फोटके विकत घेतो आणि त्यापासून बॉम्ब बनविण्याचा कारखाना चालवतो. भविष्यात अशा प्रकारच्या गैर धंद्यांची व्याप्ती वाढली तर जिल्ह्यात आणखी एका गैरधंद्यांनी भर पडणार जे जिल्ह्यासाठी अतिशय धोकादायक आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घेऊन कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अशाप्रकारच्या कारखान्यांमधून मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − fifteen =