You are currently viewing बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम आँनलाईन नोंदणी करावी

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम आँनलाईन नोंदणी करावी

*बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम आँनलाईन नोंदणी करावी*

वैभववाडी

बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शैक्षणिक वर्ष २०२३/२४ पासून नवीन शैक्षणिक धोरण-२०२० अमलात येणार आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम वर्गासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रथम ऑनलाईन प्रवेश घेणे आवश्यक आहे. सदर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची हार्डकाॅपी घेऊन महाविद्यालयात येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सदर ऑनलाईन प्रवेश हा महाविद्यालयात येऊन किंवा कोणत्याही संगणक केंद्रावर जाऊन करू शकता. सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा फोटो, सहीचा नमुना, आधार कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल, एबीसी आयडी, दहावी व बारावीचे गुणपत्रक व जात प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. सदर अर्ज भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने २७ मे पासून सुरुवात केली असून ऑनलाईन अर्ज फक्त १२ जून दुपारी एक वाजेपर्यंत भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कोणतीही फी आकारत नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आँनलाईन अर्ज भरणे सोईचे राहील. सदर भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट महाविद्यालयांमध्ये येऊन व त्या अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे देऊन प्रवेश फी भरावी. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरत असताना एबीसी आयडी अर्थात डीजी लॉकर अकाउंट काढावयाचे आहे. त्यासाठी आपल्या आधारकार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो सोबत असावा. कारण त्याच मोबाईलवर ओटीपी येत असतो याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घेऊन आँनलाईन प्रवेश प्रक्रिया पुर्ण करावी असे आवाहन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.सी. एस. काकडे यांनी केले आहे.

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 3 =