You are currently viewing महापुराची मदत मिळाली कां ?
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

महापुराची मदत मिळाली कां ?

लेख सादर: अहमद मुंडे

२०२१ ला जुलै महिन्यात सोळा सतरा तारखेला. सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी अशा जिल्ह्यात अवेळी अवकाळी झालेल्या पावसाने हाहाकार उडविला होता. पुरबाधित नदीच्या कडेला असलेल्या गावांना सावरण्याचा वेळ सुद्धा मिळाला नाही. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लोकांचें संसार उघड्यावर आले घरातील संसार उपयोगी साहित्य महत्वाची कागदपत्रे जमीन खरेदी दस्त. आधार कार्ड. रेशनकार्ड. मतदान कार्ड. गॅस कार्ड. कपडे. अन्न धान्य. अशा सर्व जीवनावश्यक वस्तूंची पूर्णपणे वाट लागली होती.
सांगली जिल्ह्यातील पुरपट्ट्यातील २२ हजार ४६७ कुटुंबातील १ लाख ५ हजार ६८३ लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यातील ११ अंशतः आणि एकूण ९४ गावे पुरबाधित झाली होती. सहा जिल्ह्यातील पाण्याची क्षमता आणि अवेळी अवकाळी पडलेल्या पावसामुळे झालेली विक्रमी वाढ. कोयना. ४८ ५९ ‌‌. धोम ६.४६ ‌‌. कनहेर ४.७३ . दुधगंगा. ११.३४ . राधानगरी. ३.३६ . तुळशी. १.१ ८७ . कासारी. १.६९ ‌. पाटगाव २.३१ . धोम. बलकवाडी. १.९९ . उरमोडी. ५.६५ . तारळी ३ ७७ . अलमट्टी. ९४.३७. असे सर्व धरणानी रूद्र रूप धरले होते. सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी या जिल्ह्यात लहान मोठे बरेच बंधारे पाण्याखाली गेले. पुरामुळे सर्व जिल्ह्यांतील जनावरें. पक्षी. असे हजारो मुकी जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यातील काही वाचली आणि काही मृत्युमुखी पडली. हजारों एकर जमीन व त्यावरील हाता तोंडाला आलेली पिके वाहून गेली काही पाण्याखाली राहून कुजून गेली तर काही शेती पुराच्या पाण्याने वाहून गेली हजारो एकर शेती पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली .
मदत करण्यासाठी आलेले पथके. रत्नागिरी मध्ये सहा. रायगड मध्ये एक. सांगली जिल्ह्यासाठी दोन. सातारा जिल्हा तीन. मुंबई दोन. सिंधुदुर्ग दोन . पुण्यात दोन . अशी एनडीए आरएफ २५ पथके तैनात करण्यात आली होती महापूर चे गांभीर्य ध्यानात घेऊन नौदलाची पाच पथके. लष्कराचे एक पथक . सीमा सुरक्षा दलाची दोन . हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर. कोल्हापूर व रत्नागिरी मध्ये तैनात करण्यात आली होती अशी पुरबाधित ठिकाणी तैनात करण्यात आले होते. अशी सर्व परीस्थितीत जनतेला गोरगरीब माणसाला पुराच्या काळात मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी. ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी. तहसिलदार. सेवाभावी संस्था. सामाजिक संस्था. यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजाविले आहे.
नेते पुढारी आमदार खासदार मंत्री विरोधी पक्ष नेते. यांनी पुरबाधित क्षेत्राचा सर्वे केला काहीजणांनी हेलिकॉप्टर मधून केला तर काहीजणांनी चौकात उभे राहून. पण कोणीही. पाण्यात बुडलेली शेती. पाण्यात बुडलेली घरे. हे पहाण्यासाठी पाण्यात चिखलात कोणी गेलेच नाही. बांधावर गेले तिथे सुद्धा त्यांच्या डोक्यावर छत्री धरुन एक पीये होता. म्हणजे पुरबाधित क्षेत्राचा सर्वे हा फक्त दिखावा होता का ? आले आणि सर्व पुरपरसथिती आम्ही पाहीली आहे. लवकरात लवकर पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे. घर पडझड पंचनामे. गोठे पडझड पंचनामे. घरात घुसलेले पाणी व गाळ यांचा उंचीनुसार पंचनामा. मयत जनावरें पंचनामा. वाहून गेलेली जनावरे पंचनामा. शेती खचून वाहून जाणे पंचनामे. संसार उपयोगी साहित्य पंचनामे. दुकानदार व लहान उद्योग धंदा करणारे यांचे पुरामुळे नुकसान त्यांचे पंचनामे. तात्काळ मदत १०.००० देणे. मयत पुराच्या पाण्यामुळे यांचें पंचनामे. कोंबड्या कुत्री. मांजर मयत पंचनामे. पुरबाधित लोकांसाठी शेजारी असलेल्या गावांनी अशा लोकांची रहाण्याची. जेवनाची सोय कपडे. पांघरूण यासाठी सतरंजी. अशा वस्तूंची सोय करण्यात आली होती. पुरबाधित लोकांसाठी शासनाने रायगड. रत्नागिरी सांगली. सातारा. सोलापूर कोल्हापूर. अशा सहा जिल्ह्यांसाठी प्रति कुटुंब प्रति व्यक्ती १० किलो गहू. आणि १० किलो तांदूळ. आणि पाच लिटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा कोणीतरी पुरबाधित क्षेत्राचा सर्वे करायला आले होते त्यांनी दिला होता. कोणाला मिळाले नाही कोणाला मिळाले.खरोखरच पुरात नुकसान झाले त्यांचा सर्वे झाला कां ? त्यांना पुराची शासन जाहीर मदत मिळाली कां ? ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच पोलिस पाटील. मंडल अधिकारी. गटविकास अधिकारी. मुख्य अधिकारी. प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी. यांनी आपले कर्तव्य विना पक्षपाती पणाने पार पाडले कां ? अजून सुद्धा पुरात पडलेल्या घरांची नुकसान भरपाई मिळाली कां ? दुकानदार लहान लहान उद्योग छोटे छोटे व्यावसायिक यांना पुराची नुकसान भरपाई मिळाली कां ? असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत
नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांनी पुरबाधित क्षेत्रांचे राजकारण केले आहे कारण पुरबाधित क्षेत्र बघायचे आणि सेल्फी काढायची आम्ही किती मदत करतो आहे. आम्ही पाण्यात चिखलात जाऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. नौकानयन यांचा पुराचे पाणी पाहण्यासाठी आनंद घेतला. म्हणजे गोरगरिब जनतेवर सर्वसामान्य माणसांवर आलेल्या वाईट वेळेच हसय केलय का ?
आमच इस्लामपूर पुरबाधित लोकांना अन्न धान्य. राहण्याचा निवारा. पांघरूण यासाठी कपडे. वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून. जनावरांना चारा पाणी त्याचा निवारा त्यांची वैद्यकीय सेवा सुविधा. पुरबाधित भाग स्वच्छ करण्यासाठी विविध संस्था सामाजिक संघटना पुढे इस्लामपूर मधूनच आल्या. अशा विविध माध्यमातून पुरग्रसत भागातील लोकांना मदत उभी केली इस्लामपूर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा निशिकांत भोसले पाटील दादा युथ तर्फे पुरबाधित लोकांनी ज्या देवळात. हाॅटेल. शाळा. काॅलेज. विविध मंगलकार्य. अशा ठिकाणी आश्रा घेतलेल्या लोकांच्या साठी रोज ५०० लोकांना औषध. चहापाणी. नाष्टा. पिण्याचे पाणी. पुर परिस्थितीती पूर्ववत होईपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता. कोणताही पक्ष असो नेता कोणताही असो मदतीचा ध्यास रक्तातच असावा लागतो हे सर्व इस्लामपूर करांच्या कडून शिका.
पुरबाधित लोकांचे नुकसान झाले त्यासाठी ज्या ज्या प्रमाणात शासनाने पंचनामे करून मदत देण्याचा आदेश दिला होता त्याप्रमाणे आपल्या आपल्या गावात सर्वे झाला आहे का? आजच त्याचा पाठलाग करा. गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी यांनी पैसे घेऊन काही पंचनामे बोगस केले आहेत का. गाव आपल गावातील सर्व परस्थितीत तुम्हालाच माहीत असणार आहे कोण मोठा आहे कोण गरिब आहे. कोणाला मदत हवी होती मिळायला पाहिजे होती त्यांना मिळाली का नाही ? तुम्हालाच याचा सर्वे करण्याची गरज आहे कारणं प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी या सर्व अधिकार व कर्मचारी यांना सापेक्ष स्वच्छ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचनाम्यात बोगसपणा करणारे अधिकारी व कर्मचारी यांची आजच संबधीत जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करा.

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =