You are currently viewing शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश

सिंधुदुर्गनगरी 

सन २०२१-२२ मध्ये मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता ८ वी, ११ वी व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीना विनामुल्य प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता १० वी, ११ वी प्रवेशसाठी, व बी.ए.बी.कॉम,बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका,पदवी आणि एम.ए, एम.कॉम, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका इ. अभ्यासक्रमसाठी दि २० डिसेंबर २०२१ पर्यत अर्ज करावित. व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यत अर्ज करावित असे आवाहन दीपक घाटे सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

                गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावित. शासकीय वसतिगृहामध्ये विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, मनोरंजन कक्ष, जिम आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय ०२३६२ २२८८८२ वर संपर्क सांधावा असे आवाहन, श्री.दीपक घाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा