You are currently viewing मळेवाड – कोंडूरा मार्गावर हॉटेल चालविणाऱ्या त्या महिलेचा संवाद मिडियाकडे खुलासा

मळेवाड – कोंडूरा मार्गावर हॉटेल चालविणाऱ्या त्या महिलेचा संवाद मिडियाकडे खुलासा

सावंतवाडी :

 

मळेवाड – कोंडूरा मार्गावर गेली काही वर्षे साटेली मायनिंग सुरू झाल्यापासून एक हॉटेल सुरू झाले आहे. या मार्गावर दीर्घकाळ डंपर ची वाहतूक सुरू झाल्यामुळे नाश्ता जेवण आदींची सोय करत एका जोडप्याने हॉटेल व्यवसायात जम बसविला होता. हॉटेल व्यवसाय जोमाने सुरू झाला असल्याने मागणी प्रमाणे पुरवठा हा कमाईचा मार्ग अवलंबत तिथे गोवा बनावटीची दारू विक्री देखील सूरज झाली होती. काही लोकांच्या तक्रारीनुसार तिथे अनैतिक व्यवसाय सुरू झाल्याचे समजून आले. संवाद मीडियाने याबाबत चौकशी करत सदर प्रकरणावर प्रकाशझोत टाकला होता.

संवाद मिडियाच्या बातमीनंतर सदर हॉटेल व्यवसाय करणाऱ्या महिलेने संवाद मिडियाशी संपर्क साधून खुलासा केला. हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय करत नसल्याचे सांगत दारूच्या केसेस आपल्यावर असल्याचे कबूल केले. उपजीविकेसाठी दारू व्यवसाय केल्याचे सांगितले. परंतु आता दारू व्यवसाय करत नसून केवळ हॉटेल व्यवसाय करतो. त्याचप्रमाणे विरोधक आपली बदनामी करत असल्याचे तिने स्पष्ट केले.

संवाद मिडियाच्या बातमीनंतर आरोन्दा पोलिसांनी सदर हॉटेलची चौकशी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =