You are currently viewing दिल्ली येथे श्रीमती रतन कराड यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान …!

दिल्ली येथे श्रीमती रतन कराड यांना शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान …!

श्रीमती रतन अंबादास कराड यांचे एस.पी.सुमनाक्षर व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी विशेष कौतुक केले.

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक,वाङ्मय क्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या ,योगदान देणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. हे पुरस्कार भारतातील सर्व राज्यातील योग्य व्यक्तीची निवड करून दिले जातात. निवड करताना व्यक्तीच्या एकूण सर्वच कामाची दखल घेतली जाते. आणि योग्य मूल्यमापन करून निवड केली जाते. या विविध पुरस्कार आतील ‘विरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशिप सन्मान 2021’ हा पुरस्कार महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील सहशिक्षिका श्रीमती रतन कराड यांना प्राप्त झाला आहे . या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.श्रीमती रतन अंबादास कराड या नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत . त्या मनापासून ज्ञानदानाचे कार्य करतात . त्या अतिशय शिस्तप्रिय , समाजप्रिय , विद्यार्थीप्रिय , सेवाभावी कार्य करणाऱ्या प्रतिभावंत व बहुगुण संपन्न व्यक्तिमत्व असलेल्या आदर्श व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या सेवेतील वीस वर्षात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक,वाङ्मय क्षेत्रात विविध स्तरावर विद्यार्थी व समाज विकासासाठी बहुमोल कार्य केले आहे. यापूर्वीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाने व विविध सामाजिक संस्थांनी जिल्हा, विभाग , राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी केलेल्या सर्वच कार्याची व पुरस्काराची नोंद करणे अशक्य आहे.

शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अमाप कार्य केले आहे . विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व सामाजिक जाणिवा प्रगल्भ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे . विविध वैज्ञानिक प्रयोग , अभ्यासक्रमपूरक लेखन , शैक्षणिक साधन-सामुग्री संदर्भात मोलाचे कार्य केले. त्यांनी केलेले अध्ययन-अध्यापन विशेष लक्षणीय आहे.
सामाजिक क्षेत्रातील सरकारी धोरणानुसार आणि त्याच्या पलीकडे जाऊन स्वच्छता मोहीम , पर्यावरण संरक्षण , आरोग्य क्षेत्रात विविध कार्य कोव्हिड यौध्दा म्हणून रोगप्रतिबंधक कार्य केले.
आर्थिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून शाळेच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणे , शाळा डिजिटल करणे , संगणक पुस्तके व विविध शालोपयोगी साधने उपलब्ध करून देणे , गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे , शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लागणारी आर्थिक मदत करतात.
सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा अविष्कार व्हावा , त्यांच्या अंगी रसिकता वाढावी ,कलावंत निर्माण व्हावेत म्हणून नाट्य-चित्र , गायन क्रीडा व्याख्याने इत्यादी कलांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणे , विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करणे , कलात्मक जाणिव वाढविणे. व जीवनाला निश्चित दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.
साहित्य क्षेत्रात विशेषतः मराठी साहित्यात त्यांनी कथा-कविता, समीक्षा, स्फुटलेखन करून मोलाची भर घातलेली आहे. शिवाय विद्यार्थ्यांसाठी बोधपर व संस्कार पर पुस्तिका तयार केली आहेत.
विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन करणे , विविध सेमिनारमध्ये , प्रशिक्षण कार्यक्रमात रिसोर्स पर्सन म्हणून मार्गदर्शन करणे , भाषणे देणे ,व्याख्याने देणे व निश्चित सामाजिक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या या कार्याचे योग्य मूल्यमापन करून अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे . या पुरस्काराचे वितरण दिनांक 11 /12/ 2021 रोजी दिल्ली येथील पंचशील आश्रम बडोदा गाव बुराडी बायपास आउटर , रिंग रोड दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सत्यनारायण जातीया माजी केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण , मा.रमेशचंद्र रतन अध्यक्ष पीएससी समिती रेल्वे बोर्ड रेल्वे मंत्रालय , महेश्वर जंग गहतराज अथक मंत्री युवक व क्रिडा शासन नेपाळ ,खा.हेमंत गोडसे कार्यक्रमाचे अध्यक्ष संगप्रिया गौतम माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार , डॉ. एम. एल. रंगा माजी आरोग्यमंत्री हरियाणा , मान्यवर अतिथी म्हणून बबनराव घोलप माजी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र , यशपाल कुंडल माजी राज्यमंत्री जम्मू-काश्मीर सरकार , संजीव झा , आमदार दिल्ली सरकार ,आर .आर. बग अभियोक्ता सर्वोच्च न्यायालय , सौ.श्यामा सुंदरी अभिवक्ता सर्वोच्च न्यायालय, रेखा सिंन्हा नगर कुलसचिव डी एम सी , मिरज शेट्टी ,राष्ट्रीय अध्यक्ष एस. एस. सेना ,मारिया सिंग गौतम माजी उपसभापती दिल्ली सरकार ,ओ.पी.आझाद राष्ट्रीय अध्यक्ष बी.डी. एस. ए. यु .के. ब्रिटन.,उत्तम कुमार परिहार माननीय सदस्य नेपाळ,
सुभाष कानडे राष्ट्रीय समन्वयक, प्रा. पी. विष्णु मूर्ती अध्यक्ष दक्षिण भारत राज्य समिती , जितेंद्र मनु सेक्रेटरी दक्षिण भारत राज्य समिती,
ब्रिजलाल रविदास अध्यक्ष ईशान्य भारत राज्य समिती, डॉ.आरोन सोनी अध्यक्ष गुरु घासिदास शोध पीठ सरकार छत्तीसगड , कार्यक्रमाचे आयोजक डॉ. एस पी सुमन अक्षर ,राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सरचिटणीस आर्चरी रतनलाल सोनग्रा स्वागताध्यक्ष होते. या कार्यक्रमाला संपुर्ण देशातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा