You are currently viewing कवठणी खार बंधारा खचला: ग्रामस्थांची गैरसोय

कवठणी खार बंधारा खचला: ग्रामस्थांची गैरसोय

सरपंच यांनी वेधले खासदार विनायक राऊत यांचे लक्ष

कवठणी येथील खारबंधाऱ्याची एक बाजू अतिवृष्टीच्या पुरामुळे पूर्णपणे खचल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे खासदार विनायक राऊत यांचे कवठणी ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांच्या बागायती, नारळाची झाडे खचलेल्या भागामुळे पाण्यात गेली आहेत,२०० ते ३०० मीटरचा भाग पूर्णपणे खचलेला असून भेगा पडलेल्या आहेत काही ठिकाणी पूर्णपणे खचून सदरचा भाग नदीपात्रात गेलेला आहे तरी सदर खार बंधारा दुरुस्ती न केल्यास गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे दुरुस्ती न केल्यास येणाऱ्या पुरामुळे व बेकायदेशीर वाळू उपसामुळे सदरचा भाग खचून गावाचे मोठे नुकसान होणार आहे तरी तेरेखोल खाडीवरील काम तात्काळ करणे आवश्यक आहे.
तात्काळ उपाय म्हणून दगडी बंधारा किंवा दगडी पिचिंग करणे गरजेचे आहे अन्यथा तेथील माड बागायती नुकसान व जमीन धूप थांबणे अशक्य होणार आहे तरी लवकरात लवकर तातडीने उपाययोजना व्हावी, असे सरपंच यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा