You are currently viewing एका वयात

एका वयात

आदर्श शिक्षिका, नेशन बिल्डर अवॉर्ड, सावित्रीची लेक आदी पुरस्कार प्राप्त, विविध दैनिकांमधून सातत्याने लिखाण करणाऱ्या लेखिका कवयित्री सौ सुजाता पुरी यांची अप्रतिम काव्यरचना

एका वयात होती
गालावर सुंदर तिट..
वास्तवा पासून अनभिज्ञ
होता स्वभाव धीट..

एका वयात होती
गालावर छान खळी..
स्वप्नांच्या मागे धावताना
सत्याचा जायी बळी..

एका वयात होती
गालावर मखमली सुरकुती..
निशब्द भावना आणि
अनुत्तरीत प्रश्न किती..

तीट , खळी, सूर्कुती
काळाची अव्यक्त लक्षणे..
चिरंतन काहीच नसते
हेच यांचे सांगणे…

कळीचे होते फुल
फुलाचे होते निर्माल्य..
नियम निसर्गाचा हाच
श्रम हेच साफल्य…

सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा