You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि 11 डिसेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                        शनिवार दि. 11 डिसेंबर 2021 रेजी सकाळी 9.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा. वसंत सांस्कृतिक केंद्र, दोडामार्ग येथे कसई – दोडामार्ग नगरपंचायत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, सकाळी 11.30 वा. दोडामार्ग येथून मोटारीने ओरस-सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. शरद कृषी भवन ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक  आढावा व अहवाल प्रकाशन, दुपारी 2 वा. ओरोस – सिंधुदुर्ग येथून मोटारीने देवगड -जामसंडेकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. आगमन व मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन हॉल, जामसंडे येथे देवगड – जामसंडे नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, दुपारी 4.30 वा. देवगड – जामसंडे येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण, सायं. 5.30 वा. शिवसेना शाखा, वैभववाडी येथे वाभवे – वैभववाडी नगरपंचायत – प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, सायं. 7 वा. वैभववाडी येथून मोटारीने गावडेवाडी-कणकवलीकडे प्रयाण,सायं.7.30 वा. साई स्पोर्टस क्रिकेट मैदान, विखाळे यांच्या घराशेजारी, कलमठ (गावडेवाडी)ता.कणकवली येथे रामदास वसंत विखाळे यांचे सुपुत्र चि. निनाद यांचा शुभविवाह सोहळ्यास उपस्थिती.रात्री 8.वाजता गावडेवाडी -कणकवली येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा