You are currently viewing मत्स्य महोत्सव आयोजित पाककला स्पर्धेत संपदा जाधव प्रथम…

मत्स्य महोत्सव आयोजित पाककला स्पर्धेत संपदा जाधव प्रथम…

द्वितीय प्रगती कानविंदे तर तृतीय क्रमांक श्रेया शिरसाट

सावंतवाडी

सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे औचित्य साधत आज घेण्यात आलेल्या मत्स्य पाककला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संपदा जाधव पटकावला असून, द्वितीय क्रमांक प्रगती कानविंदे यांनी पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक श्रेया शिरसाट यांनी पटकावला आहे. तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके वैष्णवी राऊळ व सुनीता सावंत यांनी पटकावला आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रसन्ना कोदे यांनी केले होते.

भाजप प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधू आत्मनिर्भर योजनेचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक अँड परिमल नाईक, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eleven =