You are currently viewing माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे – अँड. परिमल नाईक

माझं कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे – अँड. परिमल नाईक

सावंतवाडी

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या योजने अंतर्गत सावंतवाडी शहरात आठही प्रभागातील नागरिकांचे सावंतवाडी नगर परिषदे मार्फत आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. थर्मल गन द्वारे शारीरिक तापमान, तसेच ऑक्सिमीटर द्वारे ऑक्सिजन पातळी तपासताना कोवीड -19 च्या पाश्वभूमीवर इतर लक्षणे यांची नोंद घेऊन सर्वे करण्याची मोहीम सावंतवाडी न. प. मार्फत राबविण्यात येत आहे. नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शना खाली सदर मोहीम राबविण्यात येत असून डॉ. उमेश मसुरकर यांना नोडल ऑफिस म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे, तसेच प्रत्येक प्रभाग निहाय स्वतंत्र नोडल ऑफिसर व कर्मचारी यांना त्या कामी नियुक्त केले आहे.सदर सर्वेक्षण मोहिमेला नागरिकांनी उस्फुर्त पणे पुढे येऊन सहकार्य करावे व कोरोना पाश्वभूमीवर आपली एक सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =