You are currently viewing पालकमंत्री रविंद्र चव्हाण दि. 19 व 20 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री रविंद्र चव्हाण दि. 19 व 20 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडी :

 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 19 व 20 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी सायं. 5.05 वा. गोवा मोपा विमानतळ येथे आगमन व सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. 6.00 वाजता सावंतवाडी येथे आगमन व महाविजय अभियान-2024 समारोप कार्यक्रम व ई-कोलगांव ग्रामपंचायत मोबाईल ॲप लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.स्थळ- गांधी चौक, सावंतवाडी. सांय. 07.00 वाजता सावंतवाडी येथून कासार्डे तिठ्ठा, ता. कणकवलीकडे प्रयाण, रात्री 08.00 वाजता कासार्डे विठ्ठा, ता.कणकवली येथे आगमन व माजी आमदार श्री. प्रमोद जठार, यांच्या 58 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती स्थळ:- श्री. प्रमोद जठार यांचे निवासस्थान, कासार्डे तिठ्ठा, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग रात्री 09.00 नंतर सिंधुदुर्ग येथे राखीव.

गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी पहाटे 04.00 वाजता सिंधुदुर्ग येथून दाबोलिम विमानतळ, गोवाकडे प्रयाण. सकाळी 06.00 गोवा दाबोलिम विमानतळ,येथून मुंबईकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा