You are currently viewing कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने माडखोल येथे साहित्य मेळावा संपन्न…

कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने माडखोल येथे साहित्य मेळावा संपन्न…

सावंतवाडी

येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने माडखोल येथे साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक तथा कोमसाप शाखेचे अध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर होते.
यावेळी साहित्य मेळाव्यात उपस्थित असलेल्या साहित्यिकांच्या कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले.प्रारंभी सावंतवाडी शाखेच्या सचिव प्रा.प्रतिभा चव्हाण यांनी गणेश स्तवन गायन केले.लेखिका संप्रवी कशाळीकर यांनी कथा कथन केली. अॕड.नकुल पार्सेकर यांनी स्वलिखीत ‘दो रुपये भी बहुत बडी चीज होती है बाबू.!’ हे आत्मकथन सादर करुन उपस्थितांच्या हृद्याला हात घालून सर्वांना अंतर्मूख केले. ऋतुजा सावंत-भोसले, प्रज्ञा मातोंडकर,श्री.पिळणकर आदींनी काव्य सादरीकरण केले.रामदास पारकर यांनी विविध मिमिक्रींचे सादरीकरण करुन श्रोत्यांना हसविले. बाल साहित्यिक कु.काव्या संतोष सावंत हिने ‘सात समुंदर पार’ या गीतावर अप्रतिम नृत्य सादर केले. कोमसाप सावंतवाडी शाखेचे उपाध्यक्ष अॕड.संतोष सावंत यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित स्वानुभव कथन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर म्हणाले की “कोरोना काळात सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन उपक्रमांनी ख-या अर्थाने साहित्यिकांच्या क्रियाशीलतेला वाव मिळाला मात्र यापुढे तमाम साहित्यिकांच्या कला-कौशल्यांना वाव देण्यासाठी सावंतवाडी शाखेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. सावंतवाडी शाखेकडून सातत्याने साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल.” कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रा.रुपेश पाटील यांनी केले. प्रा.प्रतिभा चव्हाण, अॕड.संतोष सावंत यांनी संयोजन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 1 =