दुचाकीची धडक बसल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात…

दुचाकीची धडक बसल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात…

सावंतवाडीतील घटना; जिवीतहानी नाही, मात्र दोन्ही गाड्यांचे नुकसान …

सावंतवाडी

वेगात येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला.ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश चौकात घडली.दरम्यान सुदैवाने रिक्षातील दोन लहान मुलांना व इतर प्रवाशांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.मात्र दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.दरम्यान अरेरावी करणाऱ्या दुचाकी चालकाला त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी यथेच्छ चोप दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची रिक्षाला जोरदार धडक बसली.यात रिक्षा पूर्णतः पलटी झाली.या रिक्षांमधून दोन लहान मुले व इतर प्रवासी प्रवास करत होते. त्यांना कोणती मोठी दुखापत झाली नाही.त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रिक्षाच्या बाहेर काढले.दरम्यान दुचाकी चालक अरेरावी करत रिक्षाचालकाच्या अंगावर गेला.यावेळी परिसरात जमलेल्या नागरिकांनी व इतर रिक्षाचालकांनी त्याला चोप दिला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.तर समझोत्यातून हे प्रकरण मिटविण्यात आल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा