You are currently viewing स्थानिक आणि बाहेरचे भेदभाव करून वाद उत्पन्न करून फूट पाडणे हेच भाजपाचे काम

स्थानिक आणि बाहेरचे भेदभाव करून वाद उत्पन्न करून फूट पाडणे हेच भाजपाचे काम

जिल्हा उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान यांचं प्रतिपादन

सावंतवाडीत आजपर्यंत एकोप्याने सर्व जाती धर्माचे… शहरात जुने प्रस्थापित आणि नव्याने वास्तव्यास येणारे सर्वच राहत आले आहेत. स्थानिक आणि बाहेरचे…परप्रांतीय असा कधी भेदाभेद नव्हता आणि सत्ता उपभोगलेल्या कोणत्याही पक्षाने तसा वाद उत्पन्न केला नव्हता. अनायासे सत्ता मिळालेल्या भाजपाचे नव्यानेच राजकारणात आले आणि शहराध्यक्ष झाले असे राजकारणातील नवखे नेतृत्व असलेले अजय गोंदावळे यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या सावंतवाडीची शान असलेल्या मोती तलावाच्या काठावर पादचाऱ्यांना चालण्यास सुलभ व्हावे म्हणून यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी सावंतवाडीचा कायापालट करत फुटपाथ तयार केला त्यावर सावंतवाडी शहरवासीयांची गैरसोय करून झोपडी सदृश्य प्लास्टिक बांधून आठवडी बाजार बसविला. त्यामुळे राज्यात सुंदर शहर म्हणून नावलौकिक कमावलेलं शहर बकाल होऊन वाढलेल्या टपरी, गाडे यामुळे झोपडपट्टीचे स्वरूप आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी शहराची झालेली दुरवस्था जनतेसमोर मांडल्याने भाजपाचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी त्यावर दळवी हे व्यापारी असून व्यापाऱ्यांच्या विरोधात बोलून स्थानिक व परप्रांतीय असा नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अजय गोंदावळे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेल चे कार्याध्यक्ष हिदायतूल्ला खान यांनी काच के घरो में रहनेवाले दुसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते अशी कोपरखळी करत “अजय गोंदावळे यांनी स्थानिक व परप्रांतीय या विषयावर बोलूच नये, ज्यांच्या जीवावर मडूरा येथील नेत्यांना सावंतवाडी शहरात निवडून दिलं ते मतदार परप्रांतीय कसे?” असा सवाल करत याचा खुलासा करावा असे आवाहन केले.
पुंडलिक दळवी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यापेक्षा लोकांना होणारा त्रास पाहण्याचा सल्ला दिला. सावंतवाडीत फुटपाथवर बाजार भरतो, महिला, वृद्ध व्यक्ती जे बाजाराला येतात ते गटारात उभे राहून बाजार खरेदी करतात. त्यातून कोणाला अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? कॉलेज रोड हा शहरातील सर्वात जास्त रहदारीचा रस्ता, वाहनांची रेलचेल सर्वात जास्त असते, शाळा, कॉलेज याच बाजाराच्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे कॉलेज रोडवर फुटपाथवर बाजार भरवून फुटपाथ ची अवस्था झोपडपट्टीसारखी केली आहे. फुटपाथ वरील विद्युत खांब दोऱ्या बांधून प्लास्टिक अडकविल्याने तुटून मरणासन्न अवस्थेत पडताहेत. पर्यटकांना शहराच्या एका रस्त्याने जाताना दुसरीकडे झोपडीसदृश्य दृश्य दिसत आहे. नगराध्यक्षांनी तळ्याकाठी मंडई बसवून हीच का दूरदृष्टी दाखवून दिली आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्य रस्त्यावर बाजार भरवल्याने रस्त्यावर वाहनांचे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. बाजार कॉलेज रोडवर आल्याने बाजाराचे विकेंद्रीकरण झाले परंतु मार्केटमधील व्यापाऱ्यांचे आणि रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. पर्यायाने शहरातील स्थानिक व्यापाराचे अर्थचक्र बदलले आहे. असे मत व्यापारी उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतूल्ला खान यांनी व्यक्त केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − fifteen =