You are currently viewing शिरशिंगे शिवापुर रस्ता मार्गी

शिरशिंगे शिवापुर रस्ता मार्गी

निविदा प्रक्रिया ला मंजुरी; तीन टप्प्यात होणार रस्ता

माजी सभापती मोहन सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

सावंतवाडी

वनविभागाच्या जागेच्या प्रश्नावरून रखडलेला शिवापूर- शिरशिंगे मार्ग आता तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. या मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता यांनी मंजुरीही दिली आहे. ग्रामस्थांच्या लढ्याला यश आल्याचे माजी सभापती मोहन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती रवी मडगावकर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली यांनीही शिवापूर शिरशिंगे मार्ग होण्यासाठी प्रयत्न केले होते. या मार्गासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलन केले. उपोषण केले. पदरमोड करत मंत्रालयात चकरा मारल्या. अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आल्याचे मोहन सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा