You are currently viewing प्रकृती

प्रकृती

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.प्रवीण उर्फ जी आर जोशी यांचा अप्रतिम लेख

प्रकर्षे ण क्रियते इति प्रकृती ”
अशी सरळ सोपी व्याख्या जरी असली तरी त्या तीन शब्दात “ती ” आहे आता ती म्हणजे कोण ?
श्रुष्टी
माता
माती
तिन्हीचा अर्थबोध प्रकृती मध्ये च अपेक्षित, कोणत्याही चराचर सजीव श्रुष्टीत प्रकृती ही आलीच .
जीवाची जडण घडण म्हणजे प्रकृती किंवा स्वभाव ! सगळं बदलता येईल पण स्वभाव बदलता येत नाही आणी तो बदलण्याची शक्यता नसते
प्रकृती लक्षण —

जड आहे – म्हणजेच तमोगुणी , तम म्हणजे अज्ञान , अंधकार
मोह , माया, म्हणजेच भुरळ
पाडणारी
षड्रिपुना सोबत घेऊन असणारी ,
अक्रियाशील म्हणजेच स्वतः काही करत नाही
पण दुसऱ्या कडुन करून घेणारी अर्थात च पुरुष!
पुरुष लक्षणे —
सत्वगुणी , चेतनयुक्त जड प्रकृतीला सचेत करणारा
तिच्या जडत्वाला प्रेरणा देणारा .
अनादी अनंत मोहक रूप असणारी मोहिनीच जणु ! विश्व दायनी विश्व निर्माती सृजनशील श्रुष्टी ची आरास करणारी ! सुंदर फुलात हिरव्यागार पानात लता वेलीत , विविध रंगात विविध ढंगात , आकर्षक सुंदर फुलात सुगंध देणारी ,
मन प्रफुल्लीत करणारी सौंदर्य रचना , कोणतीही व्यक्ती असो वा पक्षी कीटक
पाखरांना आकर्षित करीत साद घालणारी , ललकारी देणारी , अशी ही प्रकृती ! फक्त तिचा साद ओळखता आला पाहिजे .

बालपणी अल्लड खट्याळ , सर्वांना मायेचा लळा लावणारी , घर अंगण परसदारी रमणारी , रोहिणी . आईला मदत करणारी , व्यवहार रीतिरिवाज शिकणारी , म्हणता म्हणता कधी रजस्वला होते कळतच नाही .
निसर्गाच्या उदात्ततेन, पखरण होत असतानाचा बदल , एकदम धीर गंभीर स्वभाव , शरीरात होणारे बदल , लाजरे बुजरेपणा अंगीकारत असताना च स्त्री सुलभ भावना जपणारी , व जबाबदारी ची जाणीव ठेवणारी , ही प्रकृती निसर्गाकडे ओढ घेत असताना , तोल सावरणारी
कल्याणी ते अभिसरीका चे बदल ! विवाहा नन्तर ची सर्वस्वी त्यागी वृत्ती देणारी प्रकृती .
प्रसूतीनंतर ची माता, तिचे प्रेम वात्सल्य, दुग्ध जनीता ! फळांचे पोषण करणारी हीच तर खरी पृथा ! धात्री ! श्रुष्टी ! अश्या अनेकविध अवस्थेतील प्रकृती तिचे पैलु तिचे वागणे
यात बदल तर होणारच
कुमारीका ते माता !
सर्व काही नैसर्गिक बदल ती लीलया सांभाळते
कधी पत्नी कधी माता कधी बहीण कधी पोषिता ही निसर्गाची जादुमय देणगी फक्त अन फक्त तमोगुणी प्रकृती च करू जाणे
मग हिला तमोगुणी का बरं म्हटले ! असा सवाल पण पडतोच क्रियाशील असूनही जड का म्हटले !
खरे तर ती त्रिगुणात्मक च आहे सर्व काही ज्ञात असता त्यागमूर्ती आहे !
म्हणुनच ती भारतीय दर्शन शास्त्रात स्तुत्य व पुजनिय आहे , विश्व जननी आहे मग ते विश्व कोणत्याही प्राणी मात्राचा असो ते शाश्वत सत्य च ! प्राणी पशु पक्षी वनस्पती ह्या सर्व प्रकृतीचे विकल्प !
यत्र नार्यस्तू पुज्यते —
अनादी अनंत अश्या स्त्री शक्तीची पुजा ही होणारच यात वाद नाही , नसावा !
तीच खरी विश्व मोहिनी !!

*प्रो डॉ जी आर प्रविण जोशी*
अंकली बेळगाव
कॉपी राईट
30 नोव्हेंबर 2021

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + three =