*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मला आवडते नऊवार….*
मला आवडते हो नऊवार
किती सुंदर दिसते नार…
असो इरकलं सोलापूरी ती
नऊवारीची आहे महती
चापूनचोपून दिसते छान
पदर डोक्यावर अभिमान
जिजाऊ तारा येसूबाई ती होऊन गेल्या चतुर..
खेड्यापाड्यात दिसती नारी
डोक्यावरून पदर भारी
नाही घसरत कधी पदर
पाहताच हो वाढे आदर
या नऊवारीने,पदराने हो गाजवली सदर…
नका मुरडू नाके हो तिला
फार शोभून दिसते नारीला
आहे खानदानी हो रूप तिचं
नावे कशाला ठेवा उगीच
पूर्वापार ही चालत आली ठेवा तिचा आदर..
मला आवडते हो नऊवार…
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
