पारंपरिक उत्सवांना बंदी, राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना मात्र वरदहस्त

पारंपरिक उत्सवांना बंदी, राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना मात्र वरदहस्त

कोरोनविषयक सामान्य जनतेला एक व सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुसरी अशी वेगळी नियमावली आहे का ? मनसेचा सवाल..

 

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री राज्यात संचारबंदीची भीती दाखवून जनतेला कोरोना नियमांचे कटाक्षाने पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत तर दुसरीकडे मात्र कुडाळ मालवणचे आमदार तालुक्यात गावोगावी पक्षाचे गर्दी करणारे कार्यक्रम घेत सुटले आहेत..!

राज्यात कोरोना विषाणू संक्रमण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्याचे मुख्यमंत्री जनतेला पुनः संचारबंदी करण्याची ताकीद देतात,सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या धार्मिक सण व पारंपरिक उत्सवांना जमावबंदीचे आदेश लागू करतात आणि प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाचे आमदार मा.वैभव नाईक तालुक्यात गावोगावी पक्षाचे गर्दी करणारे अनावश्यक कार्यक्रम घेत सुटले आहेत हे कायद्याचे उल्लंघन तर आहेच शिवाय आपल्याच वरिष्ठ नेत्याच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्या सारखे आहे अशी परखड टीका मनसे विद्यार्थीसेना तालुकाध्यक्ष गुरू मर्गज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  केली आहे. शिवाय “ठाकरे” सरकारच्या काळात सामान्य जनतेला एक न्याय व सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुसरा अशा दुटप्पी धोरणाबाबत मनसेच्या  वतीने निषेध व्यक्त करत संचारबंदीमुळे गांजलेल्या गोरगरीब जनतेकडून “मास्क नाही” म्हणून पावत्या फाडणारे प्रशासन याची दखल घेणार का असा सवाल ही उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा