You are currently viewing 29 ऑगस्ट रोजी वैभववाडीत रानभाजी महोत्सव 2023 चे आयोजन

29 ऑगस्ट रोजी वैभववाडीत रानभाजी महोत्सव 2023 चे आयोजन

वैभववाडी :

 

दिनांक 29 ऑगस्ट रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे वैभववाडी तालुका आत्मा समिती, कृषी विभाग कार्यालय वैभववाडी तसेच रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. आजच्या तरुण पिढीला आहारातील रानभाज्यांचे महत्त्व त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती मिळावी. आहारातील रानभाज्यांची असलेली परंपरा पुढे चालू रहावी. यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. सदर स्पर्धेत महिला बचत गटांना सहभाग घेता येणार आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास – 1000 रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक 750 रुपये, तृतीय क्रमांक – 500 रुपये, उत्तेजनार्थ 300 रुपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तरी या रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त महिला बचत गट यांनी सहभागी व्हावे असे आव्हान आत्मा समितीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे व तालुका कृषी अधिकारी श्री एकनाथ गुरव व रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा