You are currently viewing परब मराठा समाज तर्फे सिंधु कन्या कु. हिमानी परब यांचा सत्कार

परब मराठा समाज तर्फे सिंधु कन्या कु. हिमानी परब यांचा सत्कार

अत्यंत प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्कार विजेती सिंधु कन्या कु. हिमानी परब यांचा कसाल ता. कुडाळ येथील निवासस्थानी जाऊन परब मराठा समाज यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

कु. हिमानी उत्तम परब हिला आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय मल्लखांब पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, मुंबई जिल्ह्याचा सर्वोच्च पुरस्कार व अनेक गोल्ड मेडल्स मिळालेले आहेत.

कु. हिमानी परब हिला समस्त परब मराठा समाजाच्या वतीने पुढील कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्री.विनायक परब, आर. एल .परब, श्री. सुशिल परब, श्री. जयेंद्रथ परब, श्री. बाळकृष्ण परब, श्री. यशवंत परब, सौ. उमा परब, श्री. विनोद परब तसेच हिमानी चे वडील उत्तम परब आई उमा परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा