You are currently viewing शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशन पत्र सादर

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी गुरुवारी पतसंस्था आणि कणकवली विकास सोसायटीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे श्री. नाईक यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी त्यांच्या सोबत आदी उपस्थित होते. यावेळी आम.वैभव नाईक,बँक अध्यक्ष सतीश सावंत,संदेश पारकर,व्हिक्टर डाटन्स,बाबा आंगणे,मुरलीधर नाईक,समीर हडकर,बंडू ठाकूर,अशोक नांदोस्कर,भास्कर राणे,संकेत नाईक,भूषण परुळेकर,प्रशांत वनस्कर,श्रीकांत राणे आदी उपस्थित होते.

सुशांत नाईक हे सिंधुदुर्गाच्या राजकीय क्षेत्रात सक्रिय युवा पदाधिकारी आहेत. कणकवली नगरपंचायतीवर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कणकवली व सिंधुदुर्गाच्या विकासासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. कणकवली शहराच्याविकासासाठी त्यांनी खासदार व आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने आता ते सहकार क्षेत्रात सक्रिय होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा