You are currently viewing अर्चना घारे यांना दिल्या महाविकास आघाडीने वाढदिवसाच्या शुभेच्छा…

अर्चना घारे यांना दिल्या महाविकास आघाडीने वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे यांना आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. गेली अनेक वर्षे अर्चना घारे या सहकार आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गरीब आणि रंजल्या-गांजलेल्या लोकांसाठी अनेक योजना राबवित त्यांनी सामाजिक कार्य जोपासले आहे. पवार कुटूंबियाच्या अगदी जवळच्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत.

आज त्यांच्या वाढदिवसादिनी महाविकास आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पालक मंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भाई, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व्हिक्टर डॉन्ट्स, काका कुडाळकर, संदीप घारे आदी उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − four =