You are currently viewing माय मराठी

माय मराठी

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित कवी, लेखक प्रो.डॉ प्रवीण जोशी यांची काव्यरचना*

फुला माजी मोगरीचे
परिमळे कस्तुरीचे
केकावली मयुरा ची
तैसी गा मायबोली

दुधा मध्ये नवनीत
फुलाते मकरंद
फळामध्ये आम्र रस
तैसी माझी मराठी

एकेक अक्षर असे
मोतीयांची रास
हिऱ्यामध्ये पैलु खास

धर्मात मानवधर्म
तेच सारस्वत मर्म
तेची लेखणी चे मर्म
माय मराठी

सह्याद्रीच्या ठाय
साहित्य सरिता

जशी स्वरांची श्रुती
गायकाची स्मृती
तशी गा सरस्वती
शारदा माझी

नादात नाद अनाहत
तैशी बोली अनाहत
भाग्य आमचे थोर
आम्ही गातो मराठी

प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
अंकली / बेळगाव
कॉपी राईट ऑगस्ट 2017

प्रतिक्रिया व्यक्त करा